पुस्तकांचे वितरण : ज्ञानाचा प्रसार, एका वेळी एक पुस्तक.
युवाशक्ती टीमला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, लहान मुलांना पुस्तके वाटण्यासाठी
आम्ही गोरेगावमधील शाळांना भेट देणार आहोत.
हा उपक्रम आमच्या शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या वचनबद्धतेचा एक भाग आहे,
प्रत्येक मुलाकडे त्यांना शिकण्यासाठी,
वाढण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक साधने आहेत याची खात्री करणे. दर्जेदार
शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देऊन,
युवाशक्तीचा उद्देश शिकण्याची आवड निर्माण करणे आणि आपल्या समाजातील मुलांचे
उज्ज्वल भविष्य घडविण्यात मदत करणे हे आहे.
उत्कृष्टता पुरस्कार 2024:उत्कृष्टता ही दृष्टी, समर्पण आणि
दृढनिश्चय याद्वारे अधिक परिपूर्ण स्थितीत निर्माण होण्याची क्षमता आहे.
युवाशक्ती टीमला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, लहान विद्यार्थ्यांनी 10वी,
12वी परीक्षांमध्ये चांगली कामगिरी केली आहे त्यांचे अभिनंदन करणे खूप महत्त्वाचे
आहे.
विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात अधिक यशस्वी होण्यासाठी प्रेरित करण्याची कोणतीही
संधी आपण कधीही सोडू नये, म्हणूनच युवाशक्ती टीमने हा पुरस्कार सोहळा आयोजित केला
आहे.
युवाशक्तीचा उद्देश शिकण्याची आवड निर्माण करणे आणि आपल्या समाजातील मुलांचे
उज्ज्वल भविष्य घडविण्यात मदत करणे हे आहे.
गोरेगाव 'लोकमत सखी मंच' व 'गायत्री शक्तिपीठ' यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक
गायत्री मंदिर येथे २० सप्टेंबर ते ५ ऑक्टोबरदरम्यान गरबा प्रशिक्षण आयोजित केले
आहे.
दररोज सायंकाळी ४ ते सायंकाळी ६ .
यात सहभागी सर्व सखींना पारितोषिक मिळणार आहे. सखींनी याचा जास्तीत जास्त संखेने
लाभ घ्यावा,
असे 'लोकमत सखी मंच' तालुका संयोजिका हर्षा धोंगडे व आयोजक गरबा उत्सव समिती
गायत्री शक्तिपीठ यांनी कळवले आहे.
३१ नोव्हेंबर रोजी युवाशक्ती टीमला हे जाहीर करताना आनंद होत आहे की
,लहान मुलांना फटाके वाटप करण्यासाठी गोरेगाव मधील शाळे मध्ये भेट दिली.
दिवाळी सणामध्ये फटाके वाटप हा एक महत्वाचा आणि आनंददायक भाग आहे.
फटाके वाटपाचा आनंद सर्वांसोबत वाटणे म्हणजे दिवाळीची खरी मजा!
गायत्री शक्तीपीठ गोरेगांव येथे गायत्री परिवार च्या वतीने शिव परिवार ची
प्राणप्रतिष्ठा, श्रीमद प्रज्ञा पुराण एवम् गायत्री शक्तीपीठ वार्षिक
उत्सव समारोह निमित्त विराट नौ कुंडीय गायत्री महायज्ञ एवं भव्य पुस्तक मेला दिवसीय
आयोजित करण्यात आले होते .
तसेच १२ जानेवारी २०२५ रोजी प्रज्ञा पुराण ची पूजा, स्थापना व देव आवाहनम , १३
जानेवारी रोजी शिव परिवार ची प्राणप्रतिष्ठा,
प्रज्ञापुराण कथा, सांस्कृतिक कार्यक्रम , १४ जानेवारी ला नौ कुंडीय गायत्री
महायज्ञ एवं संस्कार , संगीतमय दीप यज्ञ व तसेच १५
जानेवारी रोजी यज्ञ व टोली विदाई . या प्रकारे नौ कुंडीय महायज्ञ कार्यक्रम
भावभक्तिने परिपूर्णपणे संपन्न झाले .
युवा शक्ति स्पोर्ट्स क्लब आयोजित आमदार प्रीमियर लीग ३.० चा भव्य उद्घाटन सोहळा
गोरेगाव-तिरोडा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय
आमदार मा. श्री. विजयभाऊ रहांगडाले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या प्रसंगी अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि युवा नेतृत्वाने आपली उपस्थिती दर्शवली.
युवा शक्ति ने गेल्या
काही वर्षांत सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती
यावेळी सादर करण्यात आली. तसेच, युवकांचा क्रीडा
आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग वाढवून समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या
आमच्या प्रयत्नांवर विशेष भर देण्यात आला.
युवा शक्ती फाऊंडेशनच्या “Make a Wish” उपक्रमाला यशस्वी १० वर्षांची गौरवशाली पूर्तता
सर्वांना शुभेच्छा!
‘युवा शक्ती’च्या १० वर्षांच्या प्रवासात आपली एकत्रित मेहनत आणि समर्पण दिसून आले.
चला, या नव्या दशकातही समाज विकासासाठी नवी ऊर्जा तयार करूया.
युवा शक्ती, तरुणांचा अभिमान!
धन्यवाद!
Get In Touch
NH-753 वर बस स्टॉप समोर, मुख्य रस्ता गोरेगाव - 441801